सांगोला पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावतीने 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन फॅबटेक पब्लिक स्कूल, सांगोला येथे दिनांक २७ व २८ डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आले होते.
सदर विज्ञान प्रदर्शन हे इयत्ता 6वी ते 8 वी आणि 9 वी ते १२ वी या गटासाठी आयोजित केलेले होते. उत्कर्ष माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 9 वी मधील चि. अमेय सुहासचंद्र पवार, चि. दिक्षांत अविकांत चंदनशिवे यांचा गटाने द्वितीय क्रमांक पटकाविला. सदर विद्यार्थ्यांनी ‘नारळपाणी संकलन उपकरण’ बनविले होते.यशस्वी विद्यार्थ्यांना मंगेश कुलकर्णी, व सत्यवान भिंगार्डे तसेच विज्ञान शिक्षक- भोसले सर, सावंत सर, शेख मॅडम ,भोसले मॅडम यांनी मार्गदर्शन मिळाले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विदयालयाचे मुख्याधापक श्री कुलकर्णी सर, पर्यवेक्षक श्री. मिसाळ सर व भोसले सर, तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ .नीलिमा कुलकर्णी मॅडम ,उपाध्यक्ष डॉ.संजीवनी केळकर ,सचिव सौ .वसुंधरा कुलकर्णी, सहसचिव डॉ. केतकी देशपांडे, कोषाध्यक्ष डॉ. शालिनी कुलकर्णी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.