शिवणे:चोरट्यांनी पळविला 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल
सांगोला(प्रतिनिधी):- बंद घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेली असल्याची घटना घडली.चोरीची फिर्याद गणेश दिलीप बनसोडे (रा.शिवणे, ता.सांगोला, जि.सोलापूर) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.
याबाबत सांगोला पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की, दि.28/12/2024 रोजी रात्री 10.30 वा. चे सुमारास घरातील एका खोलीत फिर्यादी हे कुटुंबासोबत झोपलो होतो. दि.29/12/2024 रोजी पहाटे 3 वा. चे सुमारास फिर्यादी हे लघुशंके करीता उठुन घराच्या बाहेर येत असताना घराचे दाराची कड़ी कोणीतरी बाहेरून लावली होती. म्हणून फिर्यादी यांनी चुलत भाऊ विजय जगन्नाथ बनसोडे यांना फोन करून कोणीतरी बाहेरून कडी लावली आहे. असे म्हणून कडी उघडण्यास सांगितले त्यानंतर भाऊ विजय यांनी दरवाजाची कडी काढून फिर्यादी बाहेर आले असता त्यांच्या घराच्या बाजूस असलेल्या दोन खोल्यांच्या दाराची कुलपे तुटुन खाली पडले होती. आई गावी गेली असल्यामुळे त्या दोन्ही खोल्यांना लावलेले कुलुप कोणीतरी कोलुप तोडले होते. तेव्हा फिर्यादी हे कुलुप तोडलेल्या खोलीत जाऊन कपाटा जवळ गेले असता लोखंडी कपाटाच्या समोर कपटातील कपडे व सामान अस्थावेस्थ पडले होते. त्यातच फिर्यादी यांनी स्वत:चे व पत्नीचे दागिने ठेवले होते. त्याचा शोध घेतला असता ते दिसले नाहीत.तसेच गावातील मच्छिंद्र वैभव बंडगर यांचेही घर चोरांनी फोडून त्यांचे घरातील काही दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे अशी माहिती मिळालेली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
चोरट्यांनी 60 हजार रूपये किंमतीच्या दोन सोन्याच्या जेन्टस चैन, 75 हजार रुपये किंमतीच्या तीन सोन्याच्या पिळ्याच्या अंगठ्या , 10 हजार किंमतीचे कानातील फुलेजुबे , 3 हजार रुपये किंमतीचे चादिचे पैंजन व हातातील चांदीचे कडे, 6 हजार रुपये किमंतीची सोन्याची अंगठी व बाली, 75 हजार रुपये किंमतीच्या 500 रूपये दराच्या 150 चलनी नोटा व 1 हजार रूपये एक हातातील घड्याळ असा एकूण 2 लाख 30 हजार रुपयांच्या मुद्देमालन चोरट्यांनी पळवून नेला आहे.