राजकीय

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

१८२ जागांवर दोन टप्प्यात होणार मतदान

नवी दिल्लीः गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडणार असून १ आणि ५ डिसेंबरला गुजरातचं मतदान पार पडणार आहे. दरम्यान, १८ फेब्रुवारी २०२३मध्ये विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होत आहे.

गुजरातमध्ये १८२ जागांवर मतदान होणार असून गुजरातच्या १५व्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहेत. त्याचदिवशी हिमाचल प्रदेश विधानसभा निकालाचेही निकाल येणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत ४.९ कोटी मतदार असून ४.६ लाख युवा मतदार आहेत. दिव्यांगासाठी १८२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. ९. ८९ लाख वृद्ध नागरिक मतदान करणार आहेत.

गुजरातमध्ये २०१७मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकून ४.३३ कोटी मतदारांची नोंद होती. २०१७मध्ये भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीत ९९ जागांवर विजय मिळवला होता. तर, काँग्रेसला ७७ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर, दोन जागांवर बीटीपी (भारतीय ट्रायबल पार्टी) आणि एका जागेवर एनसीपीच्या उमेदवारांचा विजय झाला होता. तर, तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!