राजकुमार होवाळ यांनी स्वखर्चाने बुजविले खड्डे
सांगोला-महुद रोडवर मोठ मोठे खड्डे

महुद- सांगोला-महुद रोड अत्यंत खराब झाला असून या रोडवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या रोडवरून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.या रोडवर दररोज लहान मोठे अपघात या जीवघेण्या खड्ड्यामुळे घडत आहेत. बर्याच सामाजिक संघटनांनी सांगोला-महुद रोड खड्डेमुक्त व्हावे यासाठी विविध आंदोलने करीत शासनाचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध सुध्दा केला आहे. मात्र संबंधित खात्याकडून या रस्त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आलेने वाकी येथील सामाजीक कार्यकर्ते, आरपीआय (गवई गट) सांगोला तालुकाध्यक्ष राजकुमार होवाळ यांनी स्वखर्चाने चिंचोली येथील पुलावरील धोकादायक भयानक मोठा खड्डा बुजविला आहे. या खड्ड्यात आतापर्यंत बरेच छोटे-मोठे अपघात झाले असून पुढील अनर्थ टाळण्यासाठी हा खड्डा बुजविला असल्याचे राजकुमार होवाळ यांनी सांगितले. यावेळी दत्तात्रय टकले, सुनिल सुर्यागण यांच्याह वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.