सांगोला पोलीसांनी सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार
सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला पोलीसांच्या परिणाम कारक कारवाईमुळे सन 2024 मध्ये 140 ने गुन्हे कमी दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई केल्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुक भयमुक्त वातावरणात पार पडलेली असून चालु वर्षात 08 इसमांना संपूर्ण सोलापुर जिल्ह्यातुन हद्दपार/ स्थानबध्द करण्यात आले आहे.आगामी सन 2025 मध्ये सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येक गावातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांवर करडीनजर ठेवुन तसेच जेष्ठ नागरीक, महिला, व अल्पवयीन मुलीची छेड काढणारे लोक यांचेवर प्रभावी कारवाई करण्याचे सांगोला पोलीसांचे ध्येय आहे. येणार्या नववर्षात सांगोला तालुक्यातील सर्व अवैध धंद्याचे समूळ उच्छाटन करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांनी दिली.
तालुक्यात भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच जेष्ट नागरी, पुरुष, महिला, विद्यार्थी, नवयुवक यांच्या मनामध्ये कोणत्याही गुन्हेगाराविषयी भिती दहशत निर्माण होणार नाही. तसेच कॉलेज मधील शिक्षण घेत असलेल्या युवकांमध्ये गुन्हेगारी प्रवृतीचे लोकांकडे पाहुन आकर्षन वाटुन ते गुन्हेगारी प्रवृतीकडे वळु नये, या करीता सांगोला पोलीसांकडून सराईत आरोपींवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे.
तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी सराईत गुन्हे, जुगार, गौण खनिज, शरीराविषयक, महिलाविषयक विनयभंग, शासकीय नोकरीवरील हल्ले, खुन, अॅट्रॉसिटी अॅक्ट, फसवणुक अशा वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल असलेल्या व लोकांना त्रास देणार्या सराईत आरोपीविरुध्द तक्रार देण्यास कोणी धजावत नव्हते. व ज्या इसमाच्या विरुध्द 1 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. व त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे समाजातील लोकामध्ये दहशत निर्माण झालेली आहे. अशा आरोपीतांवर वेगवेगळ्या हेड खाली सांगोला पोलीसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विक्रांत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे, सहा.पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस उपनिरीक्षक पुजारी, दामिनी पथकाचे चव्हाण, उबाळे, एएसआय ढवणे यांनी व त्यांच्या टीमने कारवाई केली आहे.