महाराष्ट्र

सांगोला विद्यामंदिर मध्ये वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त विद्यार्थी प्रबोधन

सांगोला (वार्ताहर) सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतुकीचे कायदे, महिला सुरक्षेबाबत जागृती, सायबर गुन्हे त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाकडील शस्त्रांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी प्रबोधन पर कार्यक्रम सांगोला पोलीस स्टेशनच्या वतीने घेण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण, संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, प्राचार्य अमोल गायकवाड उपस्थित होते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी 2 जानेवारी,1961 रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र पोलीस यांच्यावतीने आज ‘Rising Day’ साजरा होत असून यानिमित्त प्रशालेतील विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाकडील पिस्टल, मशीन गन व रायफल यासारख्या शस्त्रांची माहिती देत उद्याचे सजग नागरिक घडवण्याच्या दृष्टीने विद्यार्थी व विद्यार्थिनींना सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देत मोबाईलचा अतिवापर टाळा, अभ्यासाकडे लक्ष द्या, सकस आहार घ्या, चांगल्या सवयी बाळगा व शरीर तंदुरुस्त राखा असा मोलाचा सल्ला दिला.
पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण यांनी महिला किंवा विद्यार्थिनी यांना पोलीस प्रशासनातील निर्भया पथकामार्फत समाजातील विकृतींपासून अभय दिले जात असून विद्यार्थिनींनी चुकीचे स्पर्श, आक्षेपार्ह वागणूक, सोशल मीडियावरील विकृत संदेश याविषयी योग्य वेळी पालक, शिक्षक किंवा पोलीस प्रशासनाकडे तक्रार करावी व मोठा गुन्हा घडणार नाही याची सतर्कता बाळगावी. वाईट लोकांच्या प्रलोभनाला नाही म्हणण्याचे धाडस दाखवावे असे आवाहन करत विद्यार्थिनींमध्ये साहस जागृत केले.

यावेळी सौ.जुलेखा शेख यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेबाबत कायद्यांचे विश्लेषण केले. मी सुद्धा प्रशालेची विद्यार्थिनी असून इयत्ता पाचवी ते बारावी या कालावधीत उत्कृष्ट खेळाडू म्हणून मला या शाळेनेच घडवले असे सांगत त्यांनी शाळेबद्दल ऋण व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य अमोल गायकवाड यांनी विद्यार्थी दशेपासूनच अंगी शिस्त निर्माण करणे हे शाळेचे कर्तव्य असून पोलीस प्रशासनाकडून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत प्रशालेला वेळोवेळी सांगोला पोलीस स्टेशनने केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव कोठावळे यांनी तर आभार पर्यवेक्षक प्रदीप धुकटे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव विभागाचे नरेंद्र होनराव यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.यावेळी नितीन घुले, नवनाथ कोकरे, अमोल कुंभार, गणेश कुलकर्णी, निशांत सावंजी, सागर देसाई या पोलीस स्टाफसह पर्यवेक्षक मच्छिंद्र इंगोले, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button