सांगोला :अपघातात शेतकरी मुलाचा जागीच मृत्यू तर वडील गंभीर जखमी
सांगोला (प्रतिनिधी) :दुचाकी टिप्परला पाठीमागून धडकल्याने झालेल्या अपघातात शेतकरी मुलाचा जागीच मृत्यू तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार दि.१ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील बिलेवाडी पाटी येथे घडली आहे. या अपघातात मुलगा आबासाहेब गुंडा खांडेकर वय ३६ हा जागीच ठार तर वडील गुंडा महादेव खांडेकर वय ५५ दोघेही रा. देवळे ता. सांगोला असे जखमी वडिलाचे नाव असून त्याच्यावर मिरज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुंडा महादेव खांडेकर रा. देवळे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असल्याने ऊस कारखान्यात घालण्यासाठी ट्रॅक्टर व मोकळ्या ट्रॉलीचे वजन बघण्यासाठी ते पिता-पुत्र सांगोला येथे आले होते, ट्रॉली चे वजन करून दोघे पिता पुत्र दुचाकीवरून घरी जात असताना सांगोला पंढरपूर रोडवरील बिलेवाडी पाटी येथे रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या टिप्परला दुचाकीची धडक झाल्याने झालेल्या अपघातात मुलगा आबासाहेब गुंडा खांडेकर हे जागीच मयत झाले तर वडील गुंडा महादेव खांडेकर हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना अत्यावश्य अवस्थेत मिरज येथील येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगोला पोलिसात खबर दिली आहे तपास पोहेकॉ डी.के. वजाळे करीत आहेत.