महाराष्ट्र

डॉ .सौ.अनुराधा प्रशांत पवार(गोरे) यांना पी.एच.डी प्राप्त.

जवळे(प्रशांत चव्हाण) :-जवळे गावचे प्रसिद्ध किराणा व्यापारी श्री.प्रकाश गोरे यांची सुकन्या डॉ . सौ.अनुराधा प्रशांत पवार(गोरे) यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती  संभाजीनगर या विद्यापीठातून *इतिहास* या विषयात पीएचडी पदवी नुकतीच प्राप्त केली आहे. त्यांनी “महाराष्ट्रातील गोंधळी समाज काल आणि आज :एक ऐतिहासिक अभ्यास” या प्रमुख विषयावर संशोधन करून पीएचडी प्राप्त केली. त्या सध्या कन्या महाविद्यालय मिरज येथे प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत.
त्याबद्दल जवळे गावातील गोरे व त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सत्कार केला. सौ.अनुराधाने अतिशय परिश्रम घेऊन प्रपंच व अध्यापन सांभाळून पीएचडी प्राप्त केली त्याबद्दल जवळे गाव व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांकडून अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!