महाराष्ट्र

उत्कर्ष विद्यालयामध्ये बाल सभा संपन्न.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन याचे औचित्य साधून (इयत्ता 6वी  वर्ग गुलमोहर ) या वर्गातील मुलांनी बाल सभेचे नियोजन केले होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांच्या हस्ते करण्यात आले.
  गुलमोहर वर्गातील विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष मनोगत – कुमारी श्रावणी तानाजी राऊत  हिने केले.
 त्यानंतर कु. भक्ती नितीन खटकाळे.कु. संजीवनी समाधान सरगर.कु. संचिता सचिन कांबळे. चि. यशराज विक्रम लवटे.चि. सुहास दत्तात्रय  खांडेकर.कु. शर्वरी बाळासाहेब आसबे कु.देवयानी विशाल सोनलकर कु.आरती बाळू पांढरे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाईंचा जीवनपट व इतर क्रांतिकारकांविषयी माहिती सांगितली. तसेच *” *मुलगी शिकली… प्रगती झाली…” या नाट्याचे उत्कृष्ट  सादरीकरण केले.
या कार्यक्रमास  माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. कुलकर्णी सर , विद्यालयाचे पर्यवेक्षक मा. श्री मिसाळ सर व मा. श्री भोसले सर  हे उपस्थित होते.तसेच इयत्ता 6 वी वर्ग शिक्षिका सपताळ मॅडम व मुलाणी मॅडम उपस्थित होत्या. या  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री. कुलकर्णी सर यांनी  विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी बालिका दिनानिमित्त घेतलेल्या या बालसभेचे कौतुक  सरांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावी गुलमोहर वर्गातील चि. अंबादास नागानंद मेटकरी याने केले. कार्यक्रमाचे आभार कु.अनम अहमद मुलाणी हिने मानले.  हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी मराठी विषय शिक्षिका कदम मॅडम यांनी विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button