सावे माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.
सावे माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी सानिका लवटे ,सुप्रिया देवकते, आकांक्षा देवकते, वैष्णवी नलवडे, आकांक्षा रड्डी, अंजली गावडे, काजल गडदे, वनिता बंडगर यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर, सहशिक्षक श्री गावडे सर, बर्गे सर अनुसे सर, मेटकरी सर, शेंडगे सर उपस्थित होते विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयातील सर्व विद्यार्थिनी विविध रंगांच्या पोशाखामध्ये व साड्या परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यानिमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व संगीत खुर्ची घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहशिक्षक श्री गावडे सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री बर्गे सर यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.