महाराष्ट्र
अशासकीय लिपिक टंकलेखक पदासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात भरती
सोलापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लिपिक-टंकलेखकाचे अशासकीय दोन पदे मेस्को मार्फत भरावयाचे आहेत. जिल्हयातील पात्र माजी सैनिकांनी सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह बुधावार दिनांक 08 जानेवारी 2025 पुर्वी जिल्हा सैनिक कार्यालयात सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद देवदत्त यांनी केले आहे.
जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या रोजगार पटावर नोंद असलेल्या युध्द विधवा युध्दजन्य कारणाव्यतिरिक्त दिवंगत झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नी यांना प्राधान्य देण्यात येईल. सदर प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्या माजी सैनिकांच्या विधवा पत्नी या पदासाठी पात्र ठरतील. प्राप्त अर्जामधील उमेदवारांची बुधवार दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी मुलाखती घेण्यात येतील.
सदर पदाकरीता मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान 30 शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र शासनाचे एमएससीआयटी प्रमाणपत्र धारण केलेले किंवा मराठी टंकलेखन येणे अनिवार्य राहील. जिल्ह्यातील माजी सैनिक, युध्द विधवा, माजी सैनिकांच्या पत्नी यांनी लाभ घ्यावा. असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद देवदत्त यांनी केले आहे.



