महाराष्ट्र

पायोनियर पब्लिक स्कूल सीबीएसई  वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा’

खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित पायोनियर पब्लिक स्कूल सीबीएसई येथे नुकताच वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाची सुरुवात राज्यात प्रथम आलेल्या गोळाफेक क्रीडापटू पायोनियर स्कूलचे माजी विद्यार्थी माननीय  कु.प्रतीक्षा येलपले यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून झाली.
या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे यलमार मंगेवाडी गावचे सरपंच मा. श्री. बापू जावीर, डेप्युटी सरपंच मा श्री अनिल पाटील, माजी डेप्युटी सरपंच मा श्री चंद्रकांत चौगुले,  माजी सरपंच मा. श्री प्रकाश सोळसे व  मा श्री दत्ता मासाळ ,  मा.श्री दत्तात्रय शिवाजी येलपले , मा.श्री सुनील (नाना) सोळसे,  मा.श्री प्रवीण भगवान येलपले व पालक वर्ग उपस्थित होते. पाहुण्यांचे मंचावर आमंत्रण करण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी परेड सादरीकरण केले. पाहुण्यांच्या हस्ते मैदानाची पूजा केली गेली. यावेळी विविध खेळात प्राविण्य मिळालेल्या खेळाडूंच्या हस्ते मैदानावर क्रीडा ज्योत फिरवण्यात आली. प्रत्येक खेळात विद्यार्थ्यांनी वचनबद्धता आणि प्रतिबद्धता दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. ढोलाच्या तालावर विद्यार्थ्यांनी कवायत सादरीकरण केले.
प्राथमिक विभागाच्या मुलांनी ऍरोबिक्स, पिरॅमिड, हे संगीत नृत्यासह आणि नाट्यपूर्ण रचनेने लयबद्ध हालचाल करून ड्रिल केले . ज्युनिअर केजी ते पाचवीच्या विद्यार्थ्यां करिता विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. कोन बॅलेन्स, कोन रेस ,हर्डल जम्प ,  लिंबू-चमचा,  बाॅल इन बास्केट,६० मिटर धावण्याची शर्यत, सॅक जम्प इत्यादी स्पर्धा बालगोपालांसाठी होत्या. क्रीडा दिन यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक श्री . सिद्धनाथ बिले सर, तसेच शाळेतील शिक्षक सौ रूपाली गायकवाड, सौ प्रतीक्षा येलपले, सौ तनुजा टोणे , सौ सारिका सावंत, सौ रूपाली इंगवले यांनी खूप परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  श्री. मयूर गौड यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री सतिश देवमारे सर यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षकांनी क्रीडा दिन उत्साहात सादर झाला.  क्रीडा स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम  झाला. शाळेचे संचालक मा श्री. अनिल येलपले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa