कडलास येथील अंगणवाडीमध्ये नवविद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा…
कडलास येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत 10 अंगणवाडी शाळेमध्ये प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला सदरचा कार्यक्रम कडलास-२ या शाळेमध्ये घेण्यात आला
या कार्यक्रमासाठी कडलास गावचे सरपंच मा. दिगंबर भजनावळे उपसरपंच बंडू लवटे , अंगणवाडी पर्यवेक्षिका शेटे मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस अंगणवाडीच्यावतीने उपस्थितांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रत्येक अंगणवाडीतील नवीन येणारे विद्यार्थी यांचा गुलाब पुष्प देऊन अंगणवाडीत प्रवेश देण्यात आला यानंतर अंगणवाडी सेविका शितल लेंडवे यांनी अंगणवाडीतील कामकाजाची माहिती उपस्थितांना दिली व अंगणवाडीच्यावतीने वेगवेगळ्या राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली तसेच अंगणवाडीच्या अडचणी व समस्या माननीय सरपंच यांना सांगितल्या
यानंतर अध्यक्षीय भाषणातून सरपंच महोदय यांनी अंगणवाडीच्या वेगवेगळ्या उपक्रमांचे कौतुक करून अंगणवाडींना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कठिबद्ध राहू अशी ग्वाही दिली हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अंगणवाडी सर्व सेविका व मदतनीस यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाची प्रास्ताविक सरिता चव्हाण यांनी केले तर आभार स्मिता पाटील यांनी मांडले.