डिकसळ येथे डॉ.अनिकेत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न

सांगोला तालुक्यातील डिकसळ येथे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोलाचे अध्यक्ष डॉ. अनिकेत (भैय्या) चंद्रकांत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त डिकसळ गावचे युवा नेते व अनिकेत भैय्या वर प्रेम करणारे समाजकार्यात अग्रेसर असणारे तुषार भाऊ शिवशरण यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिकसळ येथे सर्व विद्यार्थ्यांना वही,पेन,लेखन साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
सांगोला तालुक्यातील शेकापचे युवा नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी युवा नेते तुषार शिवशरण यांचेसह डिकसळ येथील आश्रम शाळेचे माजी मुख्याध्यापक तुकाराम भूसनर ,विदयमान मुख्याध्यापक जगधने सर,सांगोला तालुका मार्केट कमिटीचे संचालक चंद्रकांत करांडे ,तंटामुक्त समितीचेअध्यक्ष अशोक करताडे ,माजी सरपंच संतोष कारंडे, चेअरमन .अप्पासाहेब भुसनर, दादासाहेब भुसनर, विकास गंगणे (टेलर), शेखर साळुंखे, राजू गेजगे, अजिंक्य बाबर, दत्ता आटपाडकर, अनिल गेजगे, विश्वास यादव सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिकसळचे सर्व शिक्षक, डॉ अनिकेत भैय्या देशमुख युवामंच व ग्रामस्थ उपस्थित होते.



