जुन्या पेंशन योजना लागू करण्यासाठी पुकारलेल्या बेमुदत संपात तलाठी संघ शाखा सांगोला सहभागी

सांगोला:- जुन्या पेंशन योजना लागू करण्यासाठी पुकारलेल्या बेमुदत संपात तलाठी संघ शाखा सांगोला सहभागी झाला असून १४ डिसेंबर पासुन महाराष्ट्र राज्य तलाठी संघ शाखा सांगोला चे सर्व सभासद या आंदोलनात सहभागी होणार आहे.
सन 2005 नंतर कामावर रुजू झालेले सर्व शासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करावी म्हणून 14/12/2023 पासून होणारे बेमुदत संपाच्या अनुषंगाने तलाठी संघ शाखा सांगोला यांच्यावतीने तहसीलदार सांगोला यांना निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला संलग्न आहे. जुन्या पेंशन योजना लागू करण्यासाठी मध्यवर्ती संघटनेने १४ डिसेंबर पासुन बेमुदत कामबंद आंदोलन करीत असल्याबाबत शासनाला दि. २४/११/२०२३ रोजी नोटीस दिलेली आहे.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेशी संलग्न असत्याने दिनांक १४ डिसेंबर पासुन महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे सर्व सभासद या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तरी दिनांक १४ डिसेंबर पासुन महाराष्ट्र राज्य तलाठी संघ शाखा सांगोला चे सर्व सभासद या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे..सदर निवेदन देते प्रसंगी सांगीला तालुका तलाठी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.