सांगोला तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी श्री हरिश्चंद्र जाधव यांची निवड

सांगोला:- सांगोला तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी श्री हरिश्चंद्र जाधव यांची तर उपाध्यक्षपदी  श्री. गणेश  भुजबळ
व श्रीम. जयश्री कल्लाळे  यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन तलाठी संघ कार्यकारिणी संदर्भात सांगोला तालुका तलाठी संघाच्या पदाधिकारी व सदस्यांचे नुकतीच बैठक संपन्न झाली या बैठकीत नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.संघटनेच्या सचिव पदी श्री. विशाल  जगाते , कार्याध्यक्षपदी श्री. किरण  बाडीवाले, खजिनदारपदी श्री. प्रसन्नजीत कांबळे , सह सचिवपदी श्री. संभाजी जाधव यांची निवड करण्यात आली.

हिशोब तपासनीस म्हणून श्री. समाधान वगरे , श्री.सावापा लांडगे  , श्री. नितीन इंगोले   यांची तर  संघटक पदी 1)श्री. औदुंबर लिगाडे, 2) श्री. बाळासाहेब शिंदे, 3) श्री. योगेश  बोदमवाड यांची निवड करण्यात आली.सल्लागार  पदी श्री.सुनील जाधव, श्री. उमेश सूर्यवंशी, श्री. विनोद भडंगे, श्री. गणेश तिके , श्रीम. विजया नाईक, श्री. उल्हास पोलके , श्री. प्रशांत जाधव यांची निवड करण्यात आली.
विशेष निमंत्रित म्हणून श्रीम. योग्यता खटाळ , श्रीम. दिपा गुप्ता , श्रीम. अपर्णा मोरे , श्रीम. वैशाली गायकवाड , श्रीम. निलोफर मुजावर, श्री. राजेंद्र शिर्के ,श्री. गणेश तनमोर यांची निवड करण्यात आली.

सांगोला तालुका तलाठी संघाच्या नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचे सांगोला तालुक्यासह परिसरात सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button