अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्षबागांचे पंचनामे करून त्वरीत नुकसान भरपाई मिळावी-डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख

मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना.अनिल पाटील यांचे कडे निवेदनाव्दारे मागणी 

अवकाळी पावसाने राज्यातील‌ द्राक्ष बागायतदारांचे विशेषता सांगोला मतदारसंघातील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने मदत मिळावी अशा आशयाचे निवेदन पुरोगामी युवक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना.अनिल पाटील यांना दिले.
     विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुर येथे सुरु आसताना‌.पुरोगामी युवक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष भाई बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध समस्या सोडविण्यासाठी नागपुर येथे अनेक मंत्री व आमदार यांची भेट घेऊन मतदारसंघातील समस्यांचा पाढा वाचला…व स्व आबासाहेबांच्या कार्यप्रणालीची आठवण करुन देत जनतेच्या समस्या विविध नेते मंडळींच्या निदर्शनास आणून दिल्या..
 ‌‌गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे.. त्यांत द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले..बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या.व शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.आशा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे तातडीने पंचनामे करून त्यांना योग्य ति नुकसान भरपाई शासनाने ताबडतोब जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी …अशी मागणी पुरोगामी युवक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांच्या कडे निवेदनाद्वारे नागपुर हिवाळी अधिवेशनादरम्यान केली असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button