नाझरे येथे वीरभद्र जयंती उत्साहात संपन्न

नाझरे,ता.13:नाझरे(ता.सांगोला) येथे वीरभद्र जयंती उत्सवानिमित्त संपूर्ण सप्ताह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वीरभद्र जयंती उत्सवाची सुरुवात गुरुवार दि.7 डिसेंबर रोजी सुरू झाली. त्यानंतर संपूर्ण सप्ताहात ग्रंथराज ‘परमरहस्य’ या ग्रंथाचे सामुदायिक पारायण व आरती, वीरशैव भजनी मंडळ व रंगनाथ भजनी मंडळ नाझरे यांचे भजन, शिवपाठ, श्री. गुरु महादय्या रविशंकर शिवाचार्य महाराज रायपाटणकर यांचे प्रवचन व त्यानंतर महाआरती आणि महाप्रसाद.बुधवार दि.13 डिसेंबर सकाळी सूर्योदयाला ठीक 7 वाजता श्रीस पुष्पवृष्टी करून महाआरती व नंतर गावातून पालखी मिरवणूक काढून महाप्रसादाचे वाटप करून उत्सवाची सांगता करण्यात आली.याप्रसंगी नाझरे,वझरे व कारंडे वाडी व परिसरातील वीरशैव लिंगायत समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.