सांगोला (प्रतिनिधी) : वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या जिल्हा सहसचिव पदी शशिकांत बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. युनियनचे संस्थापक अध्यक्ष ॲड .प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश मोहिते यांनी नुकतीच सोलापूर जिल्हा कार्यकारणी जाहीर केली आहे. सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी प्रा.सुरज अरखराव , जिल्हा सरचिटणीस पदी प्रा.विजयकुमार लोंढे , जिल्हा संघटक पदी प्रा.सुधाकर साबळे , कोषाध्यक्ष पदी अविनाश वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.
शशिकांत बनसोडे हे अँड. प्रकाश आंबेडकरांचे कट्टर समर्थक मानले जातात. मागिल १५ ते २० वर्षांपासून अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षात ते कार्यरत आहेत. पक्षात विविध पदांवर यापूर्वी त्यांनी काम केले आहे. २०१९ च्या निवडणुकीत अँड . प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभेची निवडणूक लढविली तेव्हा त्यांनी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदाची जबाबदारी समर्थपणे पेलली होती.कामगार विंगच्या जिल्हा कार्यकारिणीवर निवड झाले बद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.