महाराष्ट्र
सांगोला रोटरी क्लबकडून वैकुंठ स्मशानभूमीत महिलांसाठी लोखंडी बेंचचे लोकार्पण
सांगोला(प्रतिनिधी): समाजोपयोगी कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सांगोला रोटरी क्लब ने समाजाची गरज ओळखून अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत.सांगोला शहरातील मंगळवेढा रोडवरील वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांची विशेशतः महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेवून चार लोखंडी बैंच बसवून दिले आहेत.सांगोला स्मशानभूमीत पुरूषांची बसण्याची सोय या अगोदरच केली गेली आहे..मात्र महिलाना खाली जमिनिवर बसावे लागत होते,ही अडचण लक्षात घेऊन रोटरी क्लबने चार लोखंडी बेंच बसवून दिले आहेत.यासाठी महात्मा फुले संकुल व येलपले स्टील यांचे बहुमोल सहकार्य लाभले.त्याचे लोकार्पण रो.डॉ.प्रभाकर माळी,रो.अरविंद डोंबे गुरुजी व सांगोला नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक श्री विनोद सर्वगोड,सामाजिक कार्यकर्ते श्री.सोमनाथ ठोकळे,श्री. सोमनाथ बनसोडे,श्री.लक्ष्मण घणसरवाड यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष इंजि.विकास देशपांडे,सचिव विलास बिले,रोटरी सदस्य रो.इंजि.मधुकर कांबळे,रो.इंजि.अशोक गोडसे,रो. हमिद शेख,रो.इंजि.संतोष भोसले,रो.माणिकराव भोसले,रो.शरणाप्प हळ्ळीसागर,रो.श्रीपती आदलिन्गे,रो.नीलकंठ लिन्गे,रो.प्रा.राजेंद्र ठोंबरे आदि उपस्थित होते.