अखेरचा प्रवास सुखकरसाठी स्मशानभूमीत तीन जणांनी राबविले स्वच्छता अभियान

सांगोला(प्रतिनिधी):-जीवनात येणारा प्रत्येक जीव एक दिवस या पृथ्वीतलावरुन जाणारच आहे. म्हणून मानवी जीवनाचा अखेरचा प्रवासही सुखकर व्हावा, याच उद्देशाने सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर गावातील तिघांनी स्मशानभूमी परिसरात स्वच्छता अभियान राबविले. या उपक्रमाचे लक्ष्मीनगर गावासह परिसरातून कौतुक होत आहे. पत्रकार कैलास हिप्परकर, कुंडलिक जावीर व मुबारक मुलाणी आदी 3 जणांनी स्मशानभूमीची स्वच्छता करुन सामाजिक जोपासली.
सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर (दंडाचीवाडी) येथे स्मशानभूमी परिसरामध्ये गवत झाडे झुडपे व केअर कचरा मोठ्या प्रमाणामध्ये साचल्यामुळे त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी गेलेल्या लोकांना खूप त्रास होत होता. ज्या ठिकाणी दिवसा जायला माणूस घाबरतो त्या ठिकाणी शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी दुपारी 2 च्या सुमारास पत्रकार कैलास हिप्परकर हे फेरफटका मारायला गेले असता त्यांनी तात्काळ लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीचे शिपाई मुबारक मुलाणी तसेच पाणीपुरवठा कर्मचारी कुंडलिक जावीर यांच्याशी संपर्क साधला व स्मशानभूमीची दुरावस्था झालेली त्यांना समजावून सांगितले आणि तिघांनी मिळून स्मशानभूमी साफ करण्याचा निर्णय घेतला.
कुंडलिक जावीर व मुबारक मुलाणी यांनी तात्काळ खोर्या कुर्हाड पाटी झाडू घेऊन त्या ठिकाणी आले व तिघांनी मिळून दुपारी 2 वाजल्यापासून 5.30 वाजेपर्यंत स्मशानभूमी चकाचक केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे व सामाजिक कार्य केल्याबद्दल लक्ष्मीनगर ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.