सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात जिजाऊ मॉसाहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

सांगोला( प्रतिनिधी) सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांची तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील सहशिक्षक अविनाश दिघे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या संस्कारांची तसेच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब यांचा सहभाग कसा महत्त्वाचा आहे हे पटवून दिले त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांची वैचारिक प्रगल्भता भारतासाठी कशी तारक आहे हे समजावून सांगत शिकागो येथील स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील प्रसंग सांगितले.तसेच हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करताना त्यांनी हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे याचे ज्ञान संपूर्ण जगाला दिल्याचे स्पष्ट केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रभावती
आजूर यांनी केले. तर आभार इकबाल शेख यांनी मानले.
सदर कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



