महाराष्ट्र
जवळे पंचक्रोशीत मकर संक्रातीचा सण उत्साहात साजरा.
जवळे (वार्ताहर)जवळे पंचक्रोशीतील जवळे गाव तरंगेवाडी बुरंगेवाडी,आगलावेवाडी,भोपसेवा
सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी भोगी साजरी करण्यात आली.तर मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्राती दिवशी दिवसभर महिला वर्गाचा ओवसण्याचा तसेच वाण लुटायचा कार्यक्रम सुरू होता. यामध्ये जवळे गावातील एसटी स्टँड परिसर,साळुंखे गल्ली,कोष्टी गल्ली, सुतार गल्ली, श्री.नारायण मंदिर परिसर,अंबिका वस्ती,पांढर वस्ती कै.आ. काकासाहेब साळुंखे-पाटील नगर, एम एस सी बी रोड आदि परिसरातील महिला मकर संक्राती साजरी करण्यासाठी एकत्रित आल्या होत्या. यावेळी महिलांनी एकमेकींना छोटीशी भेटवस्तू दिली. तसेच सोशल मीडियाच्य माध्यमातून दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.