महाराष्ट्र

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 26 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर ,दि. 13 :  क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांमध्ये जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू,  साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडू व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यासाठी 26 जानेवारीपूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
        नियमावलीनुसार सन 2022-23 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी, दिव्यांग खेळाडू आदींकडून दि. 14 ते 26 जानेवारी या मुदतीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. क्रीडा विभागाच्या  https://sports.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरील ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button