महाराष्ट्र
सांगोला विद्यामंदिरमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी वही वाटप संपन्न

सांगोला (वार्ताहर) सांगोला शहरातील ज्येष्ठ विधीज्ञ उदयबापू घोंगडे व व प्रतिष्ठित व्यापारी आनंद काका घोंगडे यांच्यावतीने सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना कै. प्रणव घोंगडे यांचे स्मरणार्थ वही वाटप करण्यात आले.
कै. प्रणव याच्या स्मृती प्रित्यर्थ गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत शैक्षणिक सहाय्य केल्याबद्दल प्राचार्य अमोल गायकवाड यांनी घोंगडे परिवाराचे आभार व्यक्त केले. यावेळी सुमारे 500 विद्यार्थ्यांना वह्या वाटण्यात आल्या.
याप्रसंगी उद्योगपती अजिंक्य घोंगडे यांचेसह सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर, काकासाहेब नरुटे व नरेंद्र होनराव उपस्थित होते.



