सिंहगड कॅम्पस कमलापूर मधील आनंद विद्यालयाचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक

महाराष्ट्र शासनाने सन 2023- 24 या शैक्षणिक वर्षापासून एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे तो उपक्रम एक जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्यात आले या अभियानात राज्यस्तरीय विभागीय जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय असे चार प्रकारांमध्ये मूल्यमापन होणार आहे यामध्ये आनंद विद्यालय कमलापूर तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून शासनाकडून तीन लाखाचे बक्षीस मिळविले आहे
या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर खालील विविध उपक्रमाचे मूल्यमापन शाळेमध्ये केले जाते त्यामध्ये मंथन,एटीएस,अक्षरगंगा,प्रज्ञाशो ध प्रेरणा,स्कॉलरशिप, एन एम एस अशा विविध स्पर्धा परीक्षा मध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेली शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन अध्यापन,प्रशासन यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना, व्यावसायिक शिक्षणाची तोंड ओळख अंगभूत कला, कला क्रीडा गुणांचा विकास तसेच कचऱ्याचे व्यवस्थापन, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता प्लॅस्टिक मुक्त अभियान तंबाखूमुक्त क्षेत्र परसबाग मेरी माठी मेरा देश पर्यावरण संवर्धनाची जाणीव बोलक्या भिंती महावाचन चळवळ बचत बँक बाल मंत्रिमंडळ गांडूळ खत निर्मिती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्यक्तिमत्त्वाची जडणघडण वैयक्तिक स्वच्छता अशा विविध घटकांनुसार शाळेची गुणवत्ता तपासली जाते तसेच प्रशालेचे आकर्षक प्रवेशद्वार सुंदर फुलांनी भरलेली हिरवीगार झाडी लोन स्वच्छ वातावरण आर. ओ चे पाणी,स्वच्छ व सुंदर वर्ग विद्यार्थ्यांना आरामदायी बसण्यासाठी बैठक व्यवस्था सुसज्ज असे कॅम्पुटर लॅब 24 तास इंटरनेट सुविधा मोफत वाय-फाय सुविधा विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी वेगळे वॉशरूम प्रशस्त सेमिनार हॉल अभ्यासिका सुसज्ज ग्रंथालय सांडपाण्याची व्यवस्थापन रिसायकल प्लांट प्रशालेच्या संरक्षण भिंतीने झाडांनी बहरलेले असे सुसज्य क्रीडांगण अशा अनेक वैशिष्ट्याने आकर्षित असलेले आनंद विद्यालय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सहभागी होऊन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे नेहमीच विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा व गुणात्मक विकास करण्याच्या दृष्टीने सतत कार्यरत असलेले सांगोला तालुक्यातील एकमेव विद्यालय म्हणून आनंद विद्यालय याचे नावलौकिक आहे
अशा प्रशालेच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील तसेच कमलापूर गावातील सर्व विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन शैक्षणिक गुणवत्तेबरोबर सामाजिक वातावरण टिकवण्याचा प्रयत्न नेहमी प्रशालेच्या माध्यमातून होत असतो यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रो. एम.एन नवले सर,संस्थेच्या सचिवा डॉक्टर सुनंदा नवले मॅडम सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव व सिंहगड कॅम्पस सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय नवले सर तसेच सांगोला तालुक्यातील कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मा. श्री आनंद लोकरे साहेब गटशिक्षणाधिकारी मा. श्री सुयोग नवले साहेब मूल्यांकन समिती प्रशालेचे मुख्याध्यापक श्री आदलिंगे एन.डी व बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस के पाटील सर सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्य चैताली मराठी मॅडम कमलापूरचे केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार सर तसेच कमलापूर गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व ग्रामस्थ तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी या सर्वांकडून आनंद विद्यालयास प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल प्रशालेचे अभिनंदन केले तसेच या मूल्यांकनास पात्र ठरवून सांगोला तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवण्यासाठी जे अथक प्रयत्न केले त्यामध्ये कमलापूर कॅम्पसचे कॅम्पस डायरेक्टर माननीय अशोक नवले सर तसेच अभियान प्रमुख श्री तंडे एम पी व त्यांच्या प्रशालेतील सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन हे अभियान यशस्वी केले त्यामुळे या या यशामुळे यापुढे शासनाने कोणतेही नवीन अभियान राबविले तरीही त्यामध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पुरस्कार मिळवण्यासाठी प्रशाला नेहमीच गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहील असा विश्वास असा विश्वास मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी व्यक्त केलेला आहे