महात्मा बसवेश्वर युवक संघटना व वीरशैव लिंगायत समाजाचेवतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन
सांगोला(प्रतिनिधी :-बसव क्रांती दिनानिमित्त व मकर संक्रांतीनिमित्त महात्मा बसवेश्वर युवक संघटनेच्या व वीरशैव लिंगायत समाजाचे वतीने मा.तालुका अध्यक्ष अमरदादा लोखंडे यांच्या स्वखर्चातून काढलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम हनुमान मंदीर मेन रोड येथे संपन्न झाला. दिनदर्शिकेचे प्रकाशन आ.बाबासाहेब देशमुख, प्रबुध्दचंद्र झपके सर व समाजातील ज्येष्ठ व युवक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
कार्यक्रमास आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, यशराजे साळुंखे पाटील व लिंगायत समाजाचे जेष्ट नेते मा.नगराध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, मा.नगराध्यक्ष दिनाशेठ लोखंडे, तुकाराम तात्या गुळमिरे व समाजातील जेष्ठ व युवक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार माजी तालुकाध्यक्ष अमर दादा लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला.यशराजे साळुंखे पाटील यांचा सत्कार तालुकाध्यक्ष महेश गुळमिरे यांच्या हस्ते करण्यात आला
स्वागत व प्रस्ताविकात माजी तालुकाध्यक्ष अमरदादा लोखंडे म्हणाले, बरेच वर्षापासुन स्वखर्चाने दिनदर्शिका काढून समाजासाठी कार्य करत असल्याचे सांगून युवकांना व समाजसेवकांना यातून समाजकार्याची जाणीव व्हावी या उद्देशाने करत असल्याचे सांगून व आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासमोर समाजातील काही प्रश्न मांडून सहकार्याची विनंती केली.
यावेळी विनायक लोखंडे व संदेश पलसे यांना विविध पुरस्कार मिळालेबद्दल आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख म्हणाले, अमरदादा लोखंडे यांचे स्वखर्चाने समाजासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे व यापुढेही असंच चालू राहावे आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत व समाजातील काही विषय आहेत ते मार्गी लावण्याचे व त्यातून मार्ग काढून समाजाला योग्य तो न्याय मिळवून देण्याची माझी जबाबदारी असल्याचे सांगून समाजातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून मकर -संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन व त्यानंतर तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम केला. यावेळी या कार्यक्रमास समाजातील जेष्ठ मार्गदर्शक,समाज बांधव व युवक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.