शिवणे(वार्ताहर):-शिवणे गावचे माजी सरपंच बाबुराव संपत्ती पाटील (सर) यांचे मंगळवार दि.14 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय 50 होते. यशवंत माध्यमिक विद्यालय शिरभावी येथे ते सहशिक्षक म्हणून कार्यरत होते.
त्यांचे पश्चात पत्नी, 2 मुले, आई असा मोठा परिवार आहे. त्यांच्या तिसर्या दिवसाचा विधी गुरुवार दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजता शिवणे येथील स्मशानभूमीत होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.