फॅबटेक मध्ये पदवी इंजिनिअरिंगच्या सीईटी २०२५ करिता ऑनलाईन मोफत फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू
सांगोला :- बारावी सायन्स नंतर पदवी अभियांत्रिकी व पदवी फार्मसी च्या प्रवेशाकरीता सीईटी परीक्षा २०२५ अत्यंत महत्वपूर्ण आहेत. विद्यार्थी व पालक यांच्या सोयीच्या दृष्टीने पदवी इंजिनिअरिंग व फार्मसीच्या सीईटी परीक्षा २०२५ करिता ऑनलाईन मोफत फॉर्म भरण्याची सोय फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च, सांगोला मध्ये केली आहे.
सदर अर्ज भरण्यासाठी येताना विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गाशी संबंधित कागदपत्रे, आधार कार्ड, फोटो आणि अर्जाचे शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी एटीएम अथवा फोन पे/ गुगल पे सुविधा असणारा मोबाईल सोबत आणणे आवश्यक आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे यांनी दिली. बारावी सायन्स मधून उत्तीर्ण झालेल्या व सध्या बारावी सायन्समध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये पदवी इंजिनिअरिंग व फार्मसीच्या प्रवेशाकरिता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया मंगळवार, दि. ३० डिसेंबर २०२४ पासून ते दि. १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालणार आहे.
या प्रवेश परीक्षेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी अॅडमिशन समन्वय प्रा.राजकुमार गावडे ( ८४०८८८८५०४ ) व प्रा.आशिष जोशी ( ९५११८५८३९७ ) या नंबर शी संपर्क साधण्याचे आवाहन फॅबटेक टेक्नीकल कॅम्पसचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे यांनी केले आहे.