ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीच्या वतीने डॉ.बाबासाहेब देशमुख यांना जाहीर पाठिंबा

सांगोला:सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांनाऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन तन-मन-धनाने काम करून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना भरघोस मतांनी विजयी करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष जितेंद्र सूर्यगंध यांनी दिली. पाठिंबा दिल्याबद्दल ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीचे सर्व नेतेमंडळी, वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानत आपल्या विश्वासात तडा जाऊ दिला जाणार नाही. सर्वांना सन्मानाची वागणूक देऊन सर्वांना विश्वासात घेऊन या पुढील काळात काम करणार असल्याचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
सध्या काही जातीवादी पक्षाकडुन भारतीय संविधान बदलाची वक्तव्ये उघडपणे केली गेली आहेत त्यांचा संविधान बदलाचा छुपा अजंठा लक्षात आल्याने जातीवादी पक्षाला व त्या पक्षाला पाठींबा देणाऱ्या पक्षाला धडा शिकवण्यासाठी रोज अनेक दलीत संघटना शेतकरी कामगार पक्षाला पाठींबा देत आहेत. आॕल इंडिया रिपब्लिकन पार्टीचाही पाठिंबा शेतकरी कामगार पक्षाला दिला गेला. सदर पाठिंब्याचे पत्र पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मा. श्री जितेंद्र सुर्यगंध सर यांनी डॉ सौ.निकीताताई बाबासाहेब देशमुख यांना दिले.
महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक २०२४ महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्ष या पक्षाच्या वतीने २५३ सांगोला विधानसभा मतदार संच या मतदार संघातून निवडणूक लढवित आहात.
ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅङ प्रा. आनंदजी सुर्वे यांनी राज्य पातळीवर महाविकास आघाडीस पाठिंबा देण्याचे जाहिर केले आहे, तसा आदेश जिल्हा कार्यकारिणीस प्राप्त झाला आहे. म्हणून जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आपण लढवित असलेल्या मतदार संघामध्ये आमच्या पार्टीचा जाहिर पाठिंबा आहे.
आपल्या विधानसभा मतदार संघामध्ये आमचे पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेशी संपर्क साधून तसेच प्रत्यक्षात गाठीभेटी घेवून आपणांस मतदान करण्याचे आवाहन करीत आहोत. तरी आपल्या प्रचारकार्य यंत्रणेकामी आम्हास आपल्याकडून सहकार्य असावे.आपण प्रचंड बहुमताने निवडणून याल हिच ईश्वरचरणी प्रार्थना असून ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी सोलापूर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आपणांस जाहिर पाठिंबा देत असल्याचे पाठिंबा पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पाठिंबा पत्रावर जिल्हाध्यक्ष जितेंद्र सूर्यगंध, जिल्हा उपाध्यक्ष राजु खवतोडे व जिल्हा महासचिव प्रा. प्रकाश कांबळे यांच्या स्वाक्षरी आहेत