कोळे गावच्या वर्गमित्रांचा २० वर्षांनी भरला स्नेहमेळावा..

सांगोला तालुक्यातील कोळा येथील विद्यामंदिर प्रशाला जुनिअर कॉलेज कोळा सन २००३~०४ कॉलेजच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा २० वर्षांनंतर स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र भेटले एकमेकांशी संवाद साधत शाळेतील मुलांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना नव्याने उजाळा दिला. सर्वजण जुन्या आठवणींनी भारावून गेले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होता. अनेक वर्षानंतर गुरु शिष्यांची भेट असा अनोखा संगम होता शिक्षक आणि विद्यार्थी भेटून मन हरवून गेले होते बरेच शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत प्रशालेच्या प्रांगणात स्वागताला माजी शिक्षकावर विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प चा वर्षाव करण्यात त्यांनाही प्रशाला च्या वर्गाला भव्य दिव्य सजवण्यात आले होते आपल्याला ज्ञान दिलेल्या शिक्षकाचा शाल श्रीफळ फेटा देऊन तुळशीची कुंडी देऊन सत्कार समारंभ करण्यात आला.शिक्षक ही मुलांना पाहून खूप आनंदी झाले होते भारावून गेले होते. विद्या मंदिर प्रशालेच्या प्रांगणात भरलेल्या मेळाव्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व सवंगडी एकत्र जमले होते. यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून आणि सर्वांना लागवडीसाठी तुळशीचे रोप कुंडी अनेक झाडे भेट देण्यात आले. प्रथमच हा वृक्ष लागवडीचा संदेश देणारा पर्यावरणपूरक स्नेह मेळावा साजरा झाला. प्रारंभी हलगीच्या निनादात सर्वांचे स्वागत करण्यात आले. विद्यालयाच्या परिसरात संस्थेचे संस्थापक कै. बापूसाहेब झपके यांच्या फोटोस सर्वांनी अभिवादन केले. प्रशालेचे प्राचार्य श्रीकांत लांडगे यांच्याहस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सुरुवातीला प्रत्येक माजी विद्यार्थ्याने स्वतःचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य वसंतराव मोहिते प्रा शेख सर शिक्षक रफिक मनेरी सर, महादेव नरळे सर, नामदेव करांडे सर, सौ पाटणे मॅडम पत्रकार जगदीश कुलकर्णी आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना मांजी प्राचार्य वसंतराव मोहिते सर म्हणाले तब्बल २० वर्षानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र आल्याने मनस्वी आनंद झाला आहे जुन्या माजी विद्यार्थ्यांची संवाद साधल्यामुळे जुन्या आठवणीला उजाळा मिळाला अद्यापही निम्मे आयुष्य तुमच्या हातात असून त्याचा आनंद घ्या, असे आवाहन करत सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक वाटते असे त्यांनी सांगितले. प्राचार्य श्रीकांत लांडगे सर म्हणाले बऱ्याच वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांना भेटून आनंद झाला आज माजी विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत असल्याने मला त्यांचा अभिमान आहे गावातील पहिलाच विद्यार्थ्यांचा २० वर्षांनंतर झालेला भेटीचा क्षण हा आयुष्यातील सर्वांत मोठा आनंदाचा क्षण असल्याची भावना व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो असे त्यांनी सांगितले.
या स्नेह मेळाव्यात सर्वांनी एकत्र जेवण केले प्रत्येकाने आपापली ओळख करून आपल्या नोकरी, उद्योग, व्यवसायाची माहिती दिली. शाळेत असताना आलेले अनुभव, केलेल्या खोड्या, वेगवेगळ्या करामती, गमतीजमती, शिक्षकांचा खाल्लेला मार या सर्व घटनांना नव्याने उजाळा देऊन मेळाव्याचे वातावरण आनंदी केले. झालेल्या असणे स्नेह मेळाव्यात जवळपास १२० माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग नोंदवला शाळेत मिळालेल्या ज्ञानामुळेच आपण उद्योग आणि शेतीमध्ये प्रामाणिक काम करत आहे, अशा भावनाही अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. सर्व माजी विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आली विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले यामध्ये संगीत खुर्ची खेळ घेण्यात आला. यावेळी सर्वांनी शेवटी सर्वांनी जड अंतःकरणाने प्रत्येकाचा निरोप घेतला, तो पुन्हा असेच एक दिवस भेटण्याचे वचन घेऊनच निरोप घेतला ! ह्या स्नेह मेळाव्यासाठी २००३~०४ एच एस सी बॅचचे सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले..