सांगोला विद्यामंदिरमध्ये २८ मे पासून इ.११ वी प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ; २८ मे पासून अर्ज विक्री तर ८ जुन दु.३पर्यंत प्रवेशपूर्व अर्ज स्विकारले जाणार.
सांगोला(प्रतिनिधी):सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता इ.११ वी कला, वाणिज्य व शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज विक्री व अर्ज स्वीकृती : २८ मे ते ८ जून, प्रवेश अर्जाची छाननी : १० ते १५ जूनपर्यंत,पहिली गुणवत्ता यादी : १८ जून,प्रथम गुणवत्ता यादीनुसार प्रवेश : १८ ते २५ जूनपर्यंत,
दुसरी गुणवत्ता यादी : २७ जून (२७ जून ते ४ जुलैपर्यंत प्रवेश,तिसरी गुणवत्ता यादी : ५ जुलै (५ ते ८ जुलैपर्यंत प्रवेश,विशेष फेरी (एटीकेटीसह) : ९ ते १२ जुलैपर्यंत असल्याची माहिती प्राचार्य गंगाधर घोंगडे दिली.
विद्यार्थ्यांनी प्रवेशासंदर्भातील सर्व कागदपत्रे (इ.१० वी गुणपत्रिका व झेरॉक्स, मूळ शाळा सोडल्याचा दाखला व झेरॉक्स प्रत, जातप्रमाणपत्र झेरॉक्स,आधारकार्ड झेरॉक्स व दोन फोटो इ.)सादर केल्यानंतरच आपला प्रवेश निश्चित समजला जाईल.सदर वर्गात इ.१०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रवेश पूर्व अर्ज भरून देणे अनिवार्य आहे.
प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी कला शाखा- प्रा.शिवशंकर तटाळे (मो.नं.९४२३३०७५९०) वाणिज्य शाखा-प्रा.राजेंद्र कुंभार (मो.नं.९८८१५२७४२७) तर शास्त्र शाखेतील प्रवेशासाठी प्रा.
दिलीप मस्के(मो.नं.९४०४६५०४६६) व प्रा.जालिंदर मिसाळ ( मो.नं. ९९७५४९११३२)यांचेशी संपर्क साधावा.