सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत दैदीप्यमान यश; 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे 64 विद्यार्थी

सांगोला:_ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्डा कडून मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी ऑनलाइन जाहीर झाला. सदर परीक्षेत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला मधील इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले.
सदर परीक्षेसाठी प्रशालेमधून 463 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. यापैकी 456 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल 98.48% एवढा लागला. यामध्ये 95% पेक्षा अधिक गुण प्राप्त 23 विद्यार्थी, विशेष श्रेणी प्राप्त 211 विद्यार्थी, प्रथम श्रेणी प्राप्त 156 विद्यार्थी, द्वितीय श्रेणी प्राप्त 74 विद्यार्थी तर उत्तीर्ण श्रेणी प्राप्त 15 विद्यार्थी आहेत. प्रशालेतील प्रथम तीन विद्यार्थी कुमार तन्मय बनकर व सार्थक तळे (98.20% प्रथम क्रमांक), कुमारी समृद्धी म्हमाणे व कुमारी संस्कृती टकले (97.40% द्वितीय क्रमांक), कुमारी प्रेरणा दिघे व तेजस्विनी साळुंखे( 97.00% तृतीय क्रमांक) आहेत.
वरील सर्व गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सचिव मा. म .शं. घोंगडे, प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक श्री लक्ष्मण विधाते, उपप्राचार्या सौ शहिदा सय्यद, पर्यवेक्षक श्री बिभीषण माने, श्री अजय बारबोले व उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. वरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री बिभीषन माने यांनी केले तर अध्यक्षीय मनोगत प्राचार्य श्री गंगाधर घोंगडे यांनी केले. सूत्रसंचालन श्री नागेश भोसले यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक श्री लक्ष्मण विधाते यांनी व्यक्त केले. तसेच सत्काराला उत्तर देताना यशस्वी विद्यार्थी व पालक यांनी मार्गदर्शक शिक्षकांचे आभार मानून प्रशाले बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वरील दैदीप्यमान यश मिळविल्या बद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, संस्थासचिव मा. म. शं. घोंगडे, संस्था सहसचिव मा. प्रशुद्धचंद्र झपके साहेब, संस्था सहसचिव मा. विश्वेश झपके साहेब, सर्व संस्था पदाधिकारी तसेच प्राचार्य श्री गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक श्री लक्ष्मण विधाते, उपप्राचार्या सौ शहिदा सय्यद, पर्यवेक्षक श्री बिभीषण माने, श्री पोपट केदार, श्री अजय बारबोले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
तसेच सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सकाळी 8.30 ते 5.00 या वेळेमध्ये होईल याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी.