महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांना इस्त्राईलमध्ये रोजगाराच्या संधी;  इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील उमेदवारांना इस्त्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मित्र या संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासह  बांधकाम,आरोग्य व इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यावर  भर देण्यात येत आहे. याअंतर्गत इस्त्राईल देशामध्ये  नॉन वॉर झोन मध्ये  घरगुती सहाय्यक (होमबेस्ड हेल्थ केअर) या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी  याचा लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार  व उद्योजकता सहायक आयुक्त संगीता खंदारे  यांनी केले केले आहे.
सदर रोजगार संधीचा लाभ घेण्याकरीता  25 ते 45 वयोगटातील  इंग्रजी भाषेचे सामान्यज्ञान असणारे  उमेदवार पात्र असून  यासोबतच उमेदवारांकडे  काळजी वाहू  (घरगूती सहायक)  सेवांसाठी निपून/ पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले  प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.   तसेच भारतीय प्राधिकरणाव्दारे मान्यता प्राप्त केलेल्या मिडवायफरीमधील  प्रशिक्षण संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग , फिजिओथेरपी ,नर्स असिंस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक,तसेच जीडीए ,एएनएम, जीएनएम बीएससी नर्सिंगची  शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक  आहे.   याबाबततीची  तपशीलवार माहिती https://maharashtrainternationl.com या वेबपोर्टलवरील latest jobs या मधळ्याखाली उपलब्ध आहे.
तरी ईच्छूक उमेदवारांनी  सदर रोजगार संधीचा लाभ घेण्याकरिता  https://maharashtrainternationl.com या वेबपोर्टलचे आवलोकन करून ऑनलाईन पध्दतीने अप्लाय करावे.  तसेच  जिल्‍ह्यातील सर्व वेद्यकिय महाविद्यालये ,नर्सिंग कॉलेज अशा संबधीत संस्थांनी  पुढाकार घेऊन इस्त्राईल येथील  वैद्यकिय क्षेत्रातील रोजगार संधीबाबततीची माहिती  अधिकाअधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी व संबंधीत रोजगार संधीच्या अनुषंगाने अधिक माहिती करीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा असे आवाहनही कौशल्य विकास, रोजगार  व उद्योजकता सहायक आयुक्त संगीता खंदारे  यांनी केले केले आहे.
HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!