फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

या कार्यक्रमासाठी API सचिन जगताप, PSI स्नेहल चव्हाण व लेडी कॉन्स्टेबल सौ. शबनम शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तिथ होते. त्यांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच त्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले.
हा कार्यक्रम प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या वतीने व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्याथ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कॅम्पसमध्ये असणाऱ्या सर्व सोयी- सुविधेबद्दलची माहिती कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डी फार्मसीचे दूरगामी होणारे फायदे सांगून प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डी फार्मसी विभागाचे विभागप्रमुख प्रा. अश्विनी झाडे, सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.
उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना विभागप्रमुख व स्टाफ यांची ओळख करून देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ग, प्रयोगशाळा, लायब्ररी, ऑफिस, इत्यादी विभागांची माहिती करून दिली. पूर्ण वर्षाचे शेडयुल यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले, या वेळी फणी गेम्स, गीत, नृत्य व संगीत खुर्चीचा खेळ खेळण्यात आला. यामध्ये अनिलकुमार सोनलकर हा विद्यार्थी प्रथम आला.
सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला. सद्रकार्यक्रमात मिस फ्रेशर व मिस्टूर फ्रेशर यांची निवड करण्यात आली. मिस प्रेशर म्हणून कु. डिम्पल भाटी व मिस्टर फ्रेशर म्हणून अनिलकुमार सोनलकर यांची निवड करण्यात ओली. मा. प्राचार्य यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व नवीन विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा. वैष्णवी कदम, प्रा. अमृता पिंजारी, प्रा. शौनक काळे, प्रा. फरीदा शेख, प्रा. सायली माळी यांनी केले.