फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात “व्यक्तीमत्व विकास” प्रशिक्षण
सांगोला येथील फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संचलित फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील प्रथम व व्दितीय वर्ष पदवीका अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता महाविद्यालयातर्फे दि. ३० व ३१ डिसेंबर, २०२४ रोजी “व्यक्तिमत्व विकास” (पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट) या विषयावर महाविद्यालयातर्फे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते सदरील प्रशिक्षण देण्याकरिता कोल्हापूर येथील सक्सेस स्मार्ट स्किल्स चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किरण परांडेकर यांनी मुख्यतः कार्य केले.
या दोन दिवसीय प्रशिक्षणात श्री. किरण परांडेकर यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास निर्माण करणे विविध संभाषण कौशल्य तसेच यशासाठी आवश्यक असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास यावर व्याख्यान, मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाचा लाभ ७५ हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष श्री. भाऊसाहेब रुपनर संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित रुपनर कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर व परिसर संचालक डॉ. संजय आदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
सदर कार्यक्रमास कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय बैस उपस्थित होते . या उपक्रमासाठी श्री. श्रीनिवास माने यांनी सूत्रसंचालन केले आणि डी. फार्मसीच्या विभाग प्रमुख प्रा. अश्विनी झाडे आभार मानले..