तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत पायोनियर स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित पायोनियर पब्लिक स्कूल यलमार मंगेवाडी येथे राज्य क्रीडा दिनानिमित्त ग्रामपंचायत आयोजित तालुकातील खेळाडूंना चालना देण्यासाठी प्रेरणादायी उपक्रम तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा १५/०१/२०२५ आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे या उद्घाटन ओलंपिक विजेता अर्जुन पुरस्कार प्राप्त मा. श्री सचिन सर्जेराव खिलारी तसेच गोळाफेक नॅशनल खेळाडू मा. कु. प्रतिक्षा दत्तात्रय येलपले यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला अध्यक्ष सां.ता.शि.प्र. मंडळ मा.डाॅ. अनिकेत (भैय्या) देशमुख व मा.प्रा. प्रबुद्ध चंद्र झपके (सर), सांगोला युवा नेते मा .यशदादा साळुंखे -पाटील , शिवसेना जिल्हा अध्यक्ष मा. श्री सागर पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. चेतनसिंह केदार, प्रगतशील बागायतदार मा. श्री बाळकृष्ण येलपले, माजी सरपंच यलमार मंगेवाडी मा. श्री दत्तात्रय बजरंग मासाळ, सरपंच मा. सौ प्रीती बापू जावीर इत्यादी मान्यवर उपस्थिती होते. या स्पर्धेत पायोनियर पब्लिक स्कूल सीबीएसई शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला डंका वाजवीत घवघवीत यश प्राप्त केले आहे.
८ वर्षाच्या आतील वयोगटांमध्ये ६० मी . धावण्याच्या शर्यतीत कु.श्रवण पवार यांने यश मिळवला आहे.वयोगटात १० वर्षाच्या आतील विद्यार्थी ६० मी. धावण्याच्या स्पर्धेत कु. अन्वी विभुते प्रथम क्रमांक, कु. आर्या येलपले द्वितीय क्रमांक ,कु. प्रचिती येलपले तृतीय क्रमांक मिळवला आहे. १२ वर्षाच्या आतील वयोगट गोळा फेक मध्ये ओम विभुते तृतीय क्रमांक आणि वनाली विभुते द्वितीय क्रमांक मिळवला आहे.१०० मी. धावण्याच्या स्पर्धेत कार्तिक पवार प्रथम क्रमांक पटकावला आहे. लांब उडी मध्ये कु. प्रचिती येलपले द्वितीय क्रमांक तर ओम विभुते तृतीय क्रमांक प्राप्त केले आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक व इतर आजूबाजूच्या परिसरात गौरव होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या मागे शाळेचे शिक्षक मा. श्री सिद्धेश्वर बिले सर यांनी खूप कठीण परिश्रम घेतले. शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेचे संचालक मा. अनिल येलपले सर व शाळेतील प्राचार्य श्री. सतीश देवमाले सर यांनी योग्य मार्गदर्शन . व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.



