महाराष्ट्र

अजनाळे गावाला उच्चशिक्षित सरपंच मिळणे हे गावाचे भाग्य ; माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील 

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गाव आणि दर्जेदार डाळिंब उत्पादनासाठी जगाच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण केलेल्या अजनाळे ता सांगोला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी  अनिता चंद्रकांत पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान अजनाळे सारख्या श्रीमंत आणि पुढारलेल्या गावाला एम.ए. बी.एडचे शिक्षण झालेल्या सौ अनिता पवार यांच्या सारख्या उच्च शिक्षित सरपंच लाभल्या हे गावचे भाग्य आहे आगामी काळात गावाच्या सर्वागीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू असे अभिवचन यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिले.
अजनाळे गावातील शेतकऱ्यांनी केलेल्या काबाडकष्टामुळे तसेच पिकवलेल्या दर्जेदार डाळिंबामुळे पिकविलेल्या दर्जेदार डाळिंबामुळे या गावाने जगाच्या नकाशावर ओळख मिळवली आहे. हीच ओळख सौ.अनिता चंद्रकांत पवार यांच्या कामातून पुढे निर्माण होईल आणि त्यांच्या हातून गावाची रखडलेली सर्व विकासकामे मार्गी लागतील असा विश्वास यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.
नूतन सरपंच सौ अनिता चंद्रकांत पवार यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आपल्या संपर्क कार्यालयात त्यांचा सत्कार केला तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक विजयदादा येलपले, जयवंत नागने गुरुजी, चंद्रकांत पवार, ग्रामपंचायत सदस्य महादेव भंडगे, माजी नगरसेवक विनोद रणदिवे, संकेत येलपले, अर्जुन साळुंखे, आप्पासो साळुंखे, तेजस चंद्रकांत पवार अजय येलपले आदी उपस्थित होते.
अजनाळे ग्रामपंचायत ग्रामपंचायत निवडणुकीत दिपकआबा साळुंखे पाटील गट, शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना या पक्षांची स्थानिक आघाडी करण्यात आली होती. स्थानिक आघाडीतील निर्णयानुसार सरपंचपदी ही निवड करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button