सांगोला महाविद्यालयामध्ये पारंपरिक दिवस उत्साहात साजरा

सांगोला /प्रतिनिधी : सांगोला महाविद्यालयामध्ये पारंपरिक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्यामुळे विद्यार्थी वर्गात आनंदी वातावरण होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी विद्यार्थ्यांना तिळगूळ वाटप करून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रामचंद्र पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संतोष लोंढे उपस्थित होते.
या वेळी घेण्यात आलेल्या पारंपरिक वेशभूषा सादरीकरण स्पर्धेमध्ये रितेश धनवडे( बी.ए.भाग.२) याने प्रथम क्रमांक पटकाविला. कु.ज्योती राठोड ( एम.ए. भाग २ ) व्दितीय क्रमांक मिळविला, ऋषिकेश खंडागळे (बी.एस्सी. भाग.२) याने तृतीय क्रमांक मिळवला तर आदेश टकले ( बी.एस्सी.भाग.३) याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संतोष लोंढे यांनी केले. परीक्षण डॉ.विजयकुमार गाडेकर, डॉ.आर.आर. टेंभूर्णे, डॉ.विद्या जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.संतोष कांबळे, प्रा.प्रसाद लोखंडे यांनी केले. आभार प्रा. विशाल कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.