ग्रंथालय चळवळीचा दीपस्तंभ ग्रंथमित्र गुलाबराव पाटील – हरिदास घोडके

सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटी सांगोला येथे ग्रंथमित्र गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी सांगोला तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हरिदास घोडके गुरुजी आपले मनोगत व्यक्त करताना पुढे म्हणाले संघटनेसाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे चांगले काम करून ग्रंथालय सक्षमपणे चालावी यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात त्यांच्या कर्तृत्वाने कर्तृत्वामुळे मिळालेल्या पदाची त्यांनी उंची वाढवण्याचे काम व कार्य ग्रंथालय व शिक्षक संघटनेला प्रेरणादायी आहे
यावेळी प्रास्ताविक भाषणात शिक्षक संघाचे अध्यक्ष मोहन अवताडे म्हणाले गुलाबराव पाटील हाडाचे शिक्षक आहे दुर्गम भागातही त्यांनी चांगले काम केले आहे शिक्षक शिक्षकी पेशाला त्यांनी वाहून घेतले आहे यावेळी उपस्थित असलेले सुहास कुलकर्णी म्हणाले तालुका ग्रंथालय संघाला गुलाबराव पाटलामुळे वैभव प्राप्त झाले आहे लोकांचा विश्वास संपादन करून संघटनेसाठी कष्ट घेणारे व चालना देणारे त्यांचे खंबीर नेतृत्व आहे या पुढील काळात काम करणारेना ऊर्जा देण्याचे काम त्यांनी करावे असे त्यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती गुलाबराव पाटील म्हणाले मी अध्यात्मिक मार्ग स्वीकारला असून माणसाच्या जीवनात परिवर्तन व्हावे मिळालेल्या पदाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचे काम करणे हा माझा निर्धार आहे लोकातील चांगले गुण घ्या प्रेमाने माणसे जोडा असे त्यांनी शेवटी उपस्थितांना आव्हान केले यावेळी दिपकआबा सोसायटिचे चेअरन माणिक मराठे, व्हा.चेअरमन विलास डोंगरे ,तालुका सोसायटी संचालक बाबासाहेब इंगोले इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका ग्रंथालय संघाचे सचिव अशोक व्हटे सर यांनी केले उपस्थितांचे आभार दिपक आबा सोसायटी मा.चेअरमन वसंत बंडगर सर यांनी मांडले.यावेळी ग्रंथालय संघाचे पदाधिकारी ,शिक्षक संघाचे पदाधिकारी ग्रंथमिञ परिवार ,शिक्षक मिञ परिवार मोठे संख्येने उपस्थित होते..