शाकंभरी पौर्णिमेनिमित्त श्री.देवांग कोष्टी चौंडेश्वरी मंदिर जवळे येथे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त श्री.देवांग कोष्टी चौंडेश्वरी मंदिर जवळे येथे सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आनंदात संपन्न झाले. यामध्ये सकाळी 8 वाजता श्री.चौंडेश्वरी मूर्तीस जवळे ता. सांगोला येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.राजाभाऊ गुजले आणि परिवाराच्या वतीने अभिषेक करण्यात आला.तसेच श्री.चौंडेश्वरी मूर्तीसाठी भाज्या व फळे यांची सुंदर व नयनरम्य सजावट कु. वृषाली भागवत कु.रुचिता फासे तसेच कु.श्रुती मडके यांनी केली. त्याबद्दल देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष श्री.विजयकुमार तारळकर यांनी त्यांचे आभार मानले.
तसेच सुहासिनींच्या कार्यक्रमाची सायंकाळी 5 वाजून 30 मि. सुरुवात करण्यात आली.त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.सदरप्रसंगी सौ.रुपमती साळुंखे-पाटील, जवळे गावच्या सरपंच सौ.सुषमाताई घुले-सरकार यांच्यासह जवळे पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.वरील सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.देवांग कोष्टी समाज जवळे यांनी परिश्रम घेतले.