सांगोल्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

सांगोला :- महाविकास आघाडीचे माढा लोकसभेचे उमेदवार तथा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष देशाचे नेते शरदचंद्र पवार यांची शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी दुपारी दोन वाजता मार्केट यार्ड सांगोला येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर जाहीर सभेस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आय पक्षाच्या व मित्र पक्षाच्या सर्व नेतेमंडळी या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.तरी महाविकास आघाडीतील सर्व पक्षातील नेते मंडळींनी सदर जाहीर सभेस उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.