महाराष्ट्र
पायोनियर पब्लिक स्कूल तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना

खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचालित पायोनियर पब्लिक स्कूल (सीबीएसई) यलमार मंगेवाडी येथील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी पब्लिक स्कूल मधील प्रिप्रायमरी व प्रायमरी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात विविध गावांमध्ये शिवजयंती निमित्ताने कार्यक्रम सादर केले. अनेक गावातील चौकामध्ये लेझीम ,नृत्य पोवाडे व शिवगर्जना सह विविध कार्यक्रम करण्यात आले.
सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थी अजनाळे या गावा मधील ग्रामपंचायती समोर कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यावेळेस गावचे सरपंच सौ अनिता पवार , ग्रामपंचायत सदस्य महादेव भंडगे व ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यानंतर बलवडी गावातील शिवछत्रपती कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात सरपंच माऊली राऊत उपसरपंच रवी रविराज शिंदे मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव मोहिते उपस्थित ग्रामस्थांमध्ये शिवाजी गायकवाड,विनायक शिंदे, सिद्धेश्वर शिंदे, वैभव पवार ,विजय मोहिते नवनाथ शिंदे, विकास शिंदे, सुनील पवार, आप्पासाहेब शिंदे, संदीप गायकवाड असे मान्यवर उपस्थित होते.नाझरे या गावांमध्ये कार्यक्रम साजरीकरणाच्या वेळी सरपंच संजय सलगर उपसरपंच लोहट मॅडम, सांगोला तालुका पंचायत समिती माजी उप सभापती सुनील चौगुले व ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यानंतर वाटंबरे या गावांमध्ये कार्यक्रम सादरीकरणाच्या वेळी सुभाष हॉटेलचे मालक सुभाष माळी व ग्रामस्थ उपस्थित होते. ठिक ठिकाणी सादर झालेल्या कार्यक्रमांमध्ये गावकऱ्यांनी मुलांसाठी खाऊ वाटप करून त्यांच्यातला उत्साह कायम ठेवला. विद्यार्थ्यांनी व शिक्षक वर्गांनी भगवे फेटे परिधान केले होते यामुळे विविध गाव भगवेमैय बनले होते. ठीक ठिकाणी सादर होणाऱ्या नृत्य सादरीकरण पोवाड्यामधून उलगडणारी शौर्यगाथा अन भगवे झेंडे हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम शाळेतर्फे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी पायोनियर पब्लिक स्कूल सीबीएसई शाळेचे प्रिन्सिपल श्री सतीश देवमारे सर यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक सौ रुपाली गायकवाड सौ तनुजा टोने सौ प्रतिक्षा येलपले, सौ पूजा पवार, सौ सारिका सावंत, सौ रुपाली इंगवले, श्री मोहन वाघमारे यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर गौड यांनी केले. पायोनियर शाळेचे संस्थापक माननीय श्री अनिल येलपले सर यांनी मुलांना योग्य मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे शिवजयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला.