महाराष्ट्र
आदर्श बालक मंदिर व प्राथमिक विद्यालयामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी ….

आदर्श बालक मंदिर व प्राथमिक विद्यालयामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी श्री .छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सौ. मयुरी राऊत मॅडम यांनी केले. याप्रसंगी सौ. मयुरी राऊत मॅडम यांनी शिवराय हे जिजाऊंचे पुत्र, रयतेचे राजे ,स्वराज्य संस्थापक होते .ते कोणतेही काम शक्तीपेक्षा युक्तीने करत. त्यांनी अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव करून स्वराज्यांची स्वराज्याची निर्मिती केली. जनतेला समान वागणूक देणारा राजा महाराष्ट्राला मिळाला असे मनोगतातून सांगितले.
यानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली इ.4थी शांभवी माने, अनया फुले, अमृता राऊत, अनन्या जाधव, आरती संकपाळ ,निशाद फुले ,शिवानी पवार .इ. 3री शिवन्या कदम, आराध्य पवार ,क्रांती यमगर .इ.2री गौरी राऊत, शुभ्रा माने, आकांक्षा सातारकर, इशिता घोंगडे .इ.1ली शौर्य कांबळे,श्रद्धा लिंगे.शिवम शिर्के या विद्यार्थ्याने शिवरायांचा पोवाडा गायला .
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .दिपक वाघमोडे सर ,श्रीमती सुलेखा केदार मॅडम, ज्योती कुदळे मॅडम ,श्री. मयूर सुरवसे सर शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.