महाराष्ट्र

शहरात सार्वजनिक टॉयलेट सुविधा कराव्यात :-अशोक कामटे संघटना 

  सांगोला (प्रतिनिधी) महात्मा फुले चौक ते जुने एसबीआय बँकेपर्यंत कोणतीही सार्वजनिक मुतारी व शौचालयाची सुविधा नगरपालिकेने केली नसल्याने अनेक नागरिकांची कुचुंबना निर्माण होत आहे,याबाबत नगरपालिकेकडे यापूर्वी अनेकदा अशोक कामटे संघटनेने मागणी केलेली आहे. याबाबतचे निवेदन स्मरणपत्र सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांना शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे.

यापूर्वी महात्मा फुले चौकात डीसीसी बँके जवळ सार्वजनिक मुतारीची सोय होती पण ही मुतारी रातोरात पाडल्याने या ठिकाणी बिनधास्त हात गाडे लावलेले आहेत, नगरपालिका प्रशासन करते तरी काय ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. यापूर्वी देखील स्टेशन रोड परिसरात अशा प्रकारची सार्वजनिक टॉयलेट रातोरात पाडण्यात आलेले होते तरीही नगरपालिका प्रशासन याबाबत मौन पाळून आहे. मायाक्का देवी मंदिरा समोर असणारी मुतारी पाडल्याने येथील हजारो नागरिकांचा लघुशंकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तालुक्यातून व इतर भागातून अनेक नागरिक सांगोल्यात कामाकरिता सातत्याने दैनंदिन येत असतात त्यामध्ये महिला वर्गांचा मोठी संख्या आहे त्याचबरोबर पुरुषही तेवढ्याच प्रमाणात आवक-जावक करतात शहरामध्ये तीन ते चारच पुरुषांकरिता सुस्थितीत सार्वजनिक मुतारींची सोय आहे त्यामुळे नागरिकांना खुल्या जागेचा आसरा घ्यावा लागत आहे महिला वर्ग लाजून हा प्रश्न कुठेही बोलत, वाच्यता करत नसल्याने लघुशंकेची समस्या निर्माण होत आहे तरी नगरपालिकेने तात्काळ स्टेशन रोड परिसरात , सांगोला शहरात महत्वाच्या व आवशक ठिकाणी महिला व पुरुषांकरिता स्वच्छतागृह उभारावेत अशी मागणी नागरिकांनी अशोक कामटे संघटनेकडे केली आहे यावर आपणाकडून गांभीर्याने तात्काळ कार्यवाही करावी. या निवेदनाच्या प्रती आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

मा. जिल्हाधिकारीसो, सोलापूर यांनाही देण्यात आले आहेत या समस्येवर नगरपालिकेने सोई सुविधा न दिल्यास येथील नागरिकांच्या समवेत शहीद अशोक कामटे संघटना आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली.

 

याच ठिकाणी सार्वजनिक टॉयलेटची सुविधा होती रात्रीत जमीनदोस्त करून या ठिकाणी हातगाडे लावण्यात आलेले आहे.. नगरपालिका प्रशासन यावर कार्यवाही करणार का ?? असा प्रकारे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button