महाराष्ट्र

फॅबटेक पॉलिटेक्निक च्या ४९ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो कंपनीत निवड

सांगोला: कॅम्पस प्लेसमेंट मध्ये जिल्ह्यात अग्रेसर असणाऱ्या फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मधील ४९ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो कंपनीत निवड झाल्याची माहिती ट्रेनिंग एंड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.धनंजय शिवपुजे यांनी दिली.या कॅम्पस ड्राइव मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातून ३१ व मेकॅनिकल विभागातून १८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

बजाज ही देशातील सर्वात मोठी थ्री व्हीलर तयार करणारी कंपनी असून बजाज ने टू व्हिलर क्षेत्रात देखील आपला दबदबा निर्माण केला आहे.त्यामुळे आशा नावाजलेल्या कंपनी मध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होण्या आधीच विद्यार्थ्याना ऑफर मिळणे हे फॅबटेकच्या शैक्षणिक गुणवत्तेचे प्रतीक असल्याचे पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले यांनी सांगितले.

निवड झालेल्या विद्यार्थ्याना कंपनीचे अधिकारी श्री.चनगोंडा कोरे यांनी कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय अदाटे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्याना ऑफर लेटर प्रदान केले. निवड झालेल्या विद्यार्थ्याना ट्रेनिंग एंड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा.तन्मय ठोंबरे व प्रा.राहुल काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे चेअरमन श्री.भाऊसाहेब रुपनर , मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर मॅनेजमेंट प्रतिनिधी सौ.प्रजक्ता रुपनर ,मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.दत्तात्रय नरळे, इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख प्रा.महेश वाळूजकर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa