महाराष्ट्र
मानेगांव विद्यालयात वार्षिक स्नेह संम्मेलन उत्साहात संपन्न

मानेगांव विद्यालयात वार्षिक स्नेह संम्मेलन व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
सदर कार्यक्रम प्रसंगी विद्या विकास मंडळ जवळे संस्थेचे सचिव सुभाष लऊळकर , कै.सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै. आण्णासाहेब घुले ( सरकार ) कनिष्ठ महाविद्यालय जवळेचे प्राचार्य बाळासो शिंदे, श्रीराम विद्यालय हातीदचे प्राचार्य घोडके, मानेगांव विद्यालयाचे मुख्याध्यापक उबाळे सर, मुख्याध्यापक रविंद्र वाघमारे सर , क्रिडाशिक्षक अरुण खटकाळे मानेगांवच्या सरपंच सौ. ताई माणिक बाबर, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन जगन्नाथ बाबर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासो ( दादा ) बाबर , सोनाई उद्योग समूहाचे अध्यक्ष अर्जून ( तात्या ) बाबर, सोनंद केंद्राचे केंद्रप्रमुख तानाजी साळे, माजी सरपंच नारायण भाऊ बाबर या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
तसेच या कार्यक्रमासाठी भाग्य लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर बाबर, मेजर माणिक बाबर, माजी उपसरपंच दगडू बाबर, माजी सरपंच अनिल बाबर, माजी सरपंच सचिन बाबर माजी सरपंच वसंत बाबर, उपसरपंच तुकाराम बाबर, माजी सरपंच विश्वनाथ पाटील, प्राध्यापक प्रकाश बाबर सर , विनोद पाटील गुरुजी, पोपट बाबर, माजी उपसरपंच अशोक मोरे, माजी चेअरमन लालासो बाबर, बाबर ट्रॅव्हल्सचे तानाजी बाबर, वस्ताद नारायण बाबर, चेअरमन बाळासाहेब शिंदे, युवा नेते बंडू बाबर, महादेव बाबर, तानाजी बाबर, ग्रामपंचायत सदस्य बाबुराव भजनावळे, आण्णासो कांबळे तसेच मानेगांवचे उदयोजक प्रगतशील शेतकरी, बागायतदार, आजी माजी विद्यार्थी ,मानेगांव व हणमंतगांवचे सर्व पालक उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत अरुण खटकाळे सर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक उबाळे सर यांनी केले. आपले मनोगत व्यक्त करताना सचिव लऊळकर म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामधून च चांगले सर्वगुण संपन्न विद्यार्थी निर्माण होतात, त्यामुळे अशा कार्यक्रमातून नवीन कलाकार जन्माला येत असतो. असे आपले मत व्यक्त केले तसेच त्यांनी यावेळी विद्यार्थी -पालकांचे ही आभार मानले.
कार्यक्रमांच्या प्रसंगी संस्था अध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे- पाटील यांनी ही भेट देऊन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतूनच व वेगवेगळ्या खेळामधून विद्यार्थ्यांच्या कलांगुणांना संधी मिळते आणि यामधूनच चांगल्या यशस्वी व्यक्तिमत्त्वाचे विद्यार्थी घडतात असे विचार व्यक्त करून त्यांनी सहभागी विद्यार्थी व मानेगांवचे व हणमंतगावचे ग्रामस्थ या सर्वांचे वेळोवेळी सहकार्य असते त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त करून सर्व विद्यार्थी पालक , सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ या सर्वांचे कौतुक केले.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे नृत्य सादर केले यामध्ये टिपरी नृत्य, मंगळगौर, अंबाबाई गोंधळ ,कोळी नृत्य ,थीम डांन्स, शेतकरी गीत, वासुदेव गीत ,लावणी ,देश भक्तीपर गीत ,रेकॉर्ड डान्स ,अंधश्रद्धा वर आधारित नाटिका, शेतकरी आत्महत्या नाटिका, इ सारख्या कला सादर केल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोरियोग्राफर श्री बाळासो मिसाळ ,फोटोग्राफर श्री. ठोकळे व साऊंड सिस्टीम व डेकोरेशन, अमर मंडप अकोला तसेच विद्यालयाचे शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ऐवळे सर व श्री. शिंदे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अरुण खटकाळे यांनी मानले….!!!