महाराष्ट्र
उत्कर्ष विद्यालयात बालगोपालांचा आठवडा बाजार उत्साहात साजरा

उत्कर्ष प्राथमिक विद्यालयात दि- -18/1/2025 वार -शनिवार रोजी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शालेय परीसरात”*आठवडा बाजार भरविला. शिक्षण व व्यवहार यांची सांगड घालून, खरेदी- विक्री , नफा -तोटा यांचे कौशल्य विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.सर्व मुलांनी आकर्षक वेशभूषा करून भाजी विक्रेताची भूमिका साकारून , , मेथी, शेपू,पालक ,हरभरा इ. पालेभाज्या, लिंबे चिंचा- बोरे, पेरू,गाजरे , हरभऱ्याचे ढाळे, ऊस ,पेरू,कवठ शेंगा बोरे अशा विविध प्रकारची फळे मुलांनी विक्रीसाठी ठेवल्या होत्या .
भाजी घ्या….. ताजी भाजी घ्या… असं मोठयाने म्हणत मुले आपली भाजी विकत होती,. पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संध्या ताई यांनी आठवडे बाजाराला भेट देऊन भाजी खरेदी केली. मुलांचे कौतुक केले. तसेच पहिली, तिसरी , चौथी व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी देखील भाजी व फळे खरेदीचा आनंद घेतला. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनीदेखील भाजी खरेदी करून मुलाचा आनंद द्विगुणित केला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका -विश्रांतीताई व उपमुख्याध्यापिका स्वरालीताई यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ च्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.