जिल्हा परिषद शाळा मेडशिंगी विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय कला महोत्सवात सादरीकरण

मेडशिंगी(वार्ताहर):- जिल्हा परिषद शाळा मेडशिंगी येथील विद्यार्थ्यांनी सांगोला येथे अजंठा आर्ट अॅकॅडमीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कला महोत्सवात बहारदार सादरीकरण केले यामध्ये कु श्रावणी राऊत, कार्तिकी राऊत, मैत्री राऊत स्वरा सरगर मयूरी कांबळे, संबोधी कसबे, प्राची राऊत, सिध्दी वाघमोडे ,स्वप्नाली वाघमारे ,अंकिता राऊत या विद्यार्थ्यांनी बहारदार असे कोळी नृत्य सादर केले
अजंठा अॅकॅडमीचे सर्व पदाधिकारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश गडहिरे सर यांचे तोंड भरून कौतुक केले तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्राफी देवून सन्मान केला.याप्रसंगी तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री बाबासाहेब देशमुख साहेब व सुप्रसिद्ध साहित्यिक श्री इंद्रजीत घुले सर यांनी विद्यार्थी व मुख्याध्यापक श्री राजेश गडहिरे सर यांचे अभिनंदन केले. सदर नृत्य यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजेश गडहिरे सर , कोरिओग्राफी श्री मिसाळ सर तसेच माता पालक गटाच्या सदस्या सौ मंजुषा कांबळे ,सौ ज्योती युवराज राऊत, सौ वृषाली राऊत, सौ ज्योती अतुल राऊत, सौ हिना कसबे , सौ अमृता सरगर यांनी सर्व प्रकारचे सहकार्य केले.