फॅबटेक पॉलिटेक्निक मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

सांगोला :शहरातील फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन नक्षत्र २के२५ उत्साहात पार पडले. संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले .यावेळी वेळी संस्थेचे विश्वस्त डॉ.सूरज रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय अदाटे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले, ओएस राजेंद्र पाटील, अकाउंटंट सुनिल टाकळे उपस्थित होते
या कार्यक्रमाअंतर्गत आर्ट गॅलरी मध्ये रांगोळी , फोटोग्राफी ,स्केच या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या मध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांना
वाव मिळवून दिला . व्यवसायातील आर्थिक गणित समजण्यासाठी फनी गेम आणि फूड स्टॉल यांचे आयोजन करण्यात आले होते .
तसेच ट्रॅडिशनल डे ,नृत्य , गायन व विडंबन नृत्या द्वारे केलेल्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली . या वेळी विद्यार्थ्यांनी केलेला काठी न घोंगड हे लोकनृत्य विशेष लक्षवेधी ठरले . गोंधळ ,लावणी यासारख्या नृत्यातून मराठी लोककला जोपासण्याचा संदेश दिला तसेच शेतकरी आत्मकथा या नाटीकेतून समाज प्रबोधन केले .
हे स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी कल्चरल कोऑर्डिनेटर प्रा. संगीता खंडागळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.गणेश शिंदे यांनी केले.यावेळी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.